मुंबई | सध्या सुरु असलेल्या फिटनेस चॅलेंजवरुन पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर तोंडसुख घेतले आाहे. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावरुन ‘फिट इंडिया’ मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी स्वत: व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहेत. त्यानंतर स्वत: व्यायाम करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करा असे आवाहनही राठोड यांनी सर्वांना केले आहे. त्याच बरोबर राज्यवर्धनसिंह राठोड यांनी विविध सेलिब्रिटींना देखील फिटनेस चॅलेंज दिल्याचे पहायला मिळाले.
Post pictures and videos of how you keep yourself fit and send a #FitnessChallenge to your friends on social media. Here's my video 😀and I challenge @iHrithik, @imVkohli & @NSaina to join in🥊 pic.twitter.com/pYhRY1lNEm
— RajyavardhanRathore (@Ra_THORe) May 22, 2018
I really believe in the concept of, "you either win or you learn". We fought hard and gave it our all but one thing is for sure, next season we definitely will bounce back stronger than ever with our learnings from this season.
Take care. @RCBTweets #RCB #IPL2018 pic.twitter.com/b0QM9chRAN— Virat Kohli (@imVkohli) May 24, 2018
राज्यवर्धनसिंह राठोड यांनी विराट कोहली, हृतिक रोशन आणि सायना नेहवाल यांना हे चॅलेंज दिलं होते. या तिघांनीही ते पूर्ण करत, इतरांना नामांकित केले आहे. विराट कोहलीने तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी आणि पत्नी अनुष्का शर्मा यांना नामांकित करत चॅलेंज दिल्याचे पहायला मिळत आहे. तर विराट कोहलीचे चॅलेंज नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे.
Challenge accepted, Virat! I will be sharing my own #FitnessChallenge video soon. @imVkohli #HumFitTohIndiaFit https://t.co/qdc1JabCYb
— Narendra Modi (@narendramodi) May 24, 2018
फिटनेस चॅलेंज स्वीकारने सुरु असतानाच पुन्हा एकदा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. कोहलीचे हे चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारल्याचे ट्विट केल्यानंतर राहुल गांधींनी संधी साधत पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन मोदींवर निशाणा साधला आहे.
काय आहे राहुल गांधींचे ट्विट
Dear PM,
Glad to see you accept the @imVkohli fitness challenge. Here’s one from me:
Reduce Fuel prices or the Congress will do a nationwide agitation and force you to do so.
I look forward to your response.#FuelChallenge
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 24, 2018
तुम्ही विराट कोहलीचे चॅलेंज स्वीकारल्याचे पाहून आनंद झाला. आता माझेही एक चॅलेंज स्वीकारा. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा, किंवा काँग्रेस देशभरात करत असलेल्या आंदोलनात सहभागी व्हा. प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत” असे ट्विट करत राहुल गांधींनी मोदींना चॅलेंज दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.