HW News Marathi
राजकारण

घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित नाही, मी आहे त्या घरात सध्या तरी खुश – वैभव पिचड

अहमदनगर | सध्या भाजपमधील काही नेते हे राष्ट्रवादीच्या पुन्हा येतील असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. अशातच भाजप नेते वैभव पिचड यांनी यांवर उत्तर दिले आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या घरवापसीची चर्चा सुरु होती. यावर वैभव पिचड म्हणाले, “माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी सध्या तरी दिल्या घरी खुश आहे” वैभव पिचड यांनी यावेळी ‘सध्या’ असे त्यांनी म्हटल्यामूळे अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

वैभव पिचड म्हणाले, “काल परवा काही वृत्तवाहिन्यांनी ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते पुन्हा आधीच्या पक्षात परतणार असल्याच्या बातम्या दाखवल्या. यात माझाही फोटो दाखवून तसे सांगण्यात आले. मात्र, मी अनेक वृत्तवाहिन्यांशी संपर्क करुन माझा खुलासा केला आहे. माझ्याशी अद्याप कुणाचा संपर्कही झालेला नाही. तसेच माझा सध्या घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. मी आहे त्या घरात सध्या तरी खुश आहे.” असे त्यांनी सांगितले आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांच्या घरवापसीच्या चर्चेवर वैभव पिचड यांनी सध्या तरी असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आमदार परत राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते.  “निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल,” असे नवाब मलिक म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटक सरकारमध्ये नवीन मंत्रिमंडळाची स्थापना ?

News Desk

उद्या आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार! – मुख्यमंत्री

Aprna

गुजरातचे पंतप्रधान मोदी, फडणवीस मटका एजंट – राज ठाकरे

News Desk