HW News Marathi
क्रीडा

आचरेकर सरांनी मला जगायला शिकविले !

मुंबई |“माझ्या आयुष्यातील आचरेकर सरांचे योगदान शब्दात सांगणे कठीण आहे. मी आज जो काही आहे, त्याचा पाया आचरेकर सरांनी रचला आहे. गेल्या महिन्यातच मी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट शिकताना मी जे शिकलो ते मला आयुष्यभर उपयोगी ठरले. आचरेकर सरांनी मला केवळ खेळायलाच नव्हे तर जगायला देखील शिकविले”, अशी भावनिक प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी दिली आहे. सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांचे आज (२ जानेवारी) निधन झाले आहे. आचरेकर हे ८७ वर्षाचे होते. दरम्यान, रमाकांत आचरेकर यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.

रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी प्रसिद्ध खेळाडूंना घडविले आहे. आचरेकर यांनी घडविलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट विश्वात आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविला आहे. रमाकांत आचरेकर यांना भारत सरकारकडून पद्मश्री तसेच द्रोणाचार्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा

News Desk

अर्जुन पुरस्कार विजेत्यावर आईस्क्रीम विकण्याची वेळ

Gauri Tilekar

महाराष्ट्र सरकारकडून नेमबाज राही सरनोबतला पगारच नाही

News Desk