मुंबई | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फॉर समर्थन’च्या अंतर्गत रविवारी भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. या आधी महाराष्ट्रात देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची देखील शहा यांनी भेट घेतली होती. धोनीच्या भेटीनंतर आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन अमित शहा यांनी स्वतः या बाबतची माहिती शेअर केली आहे.
As part of "Sampark for Samarthan" initiative, met @msdhoni, one of the greatest finishers in world cricket. Shared with him several transformative initiatives and unprecedented work done by PM @narendramodi's govt in the last 4 years. pic.twitter.com/dpFnPWTwWn
— Amit Shah (@AmitShah) August 5, 2018
गेल्या चार वर्षात मोदी सरकारने केलेली कामगिरी शहांनी यावेळी धोनीसमोर मांडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यासोबतच सरकारने केलेल्या कामाची पुस्तिकाही धोनीला यावेळी शहा यांना दिली. सदर भेटी वेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि पक्षातील काही ज्येष्ठ मंडळीही देखील हजर होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपने संपर्क फॉर समर्थन हा उपक्रम सुरू केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.