ऑस्ट्रेलिया | पुजाराने तब्बल ९० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. चेकेश्वर पुजारा ही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात पुजाराने तब्बल १२५८ चेंडू खेळले आहेत. सिडनीच्या मैदानावर शतक करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नाकात दम केलेल्या चेतेश्वर पुजाराचे दुहेरी शतक थोडक्यात हुकले. पुजारा १९३ धावांवर बाद झाला. नॅथन लायनने त्याला बाद केले.
या विक्रमासोबतच चेतेश्वर पुजाराने इंग्लंडच्या हर्बट सटक्लिफ यांचा विक्रम मोडला आहे. सटक्लिफ यांनी अॅशेस मालिकेतील चार कसोटीत सामन्यातील ७ डावांमध्ये १२३७ चेंडूंचा सामना केला होता. ही मालिका १९२८ मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यांनी या मालिकेत एक शतक आणि दोन अर्ध शकत झळकावत ३५५ धावा केल्या होत्या. यामुळे इंग्लंडने ही मालिका ४-१ने जिंकली होती.
ऑस्ट्रेलियाविरोधातील सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी ही सिडनीत सुरू आहे. भारताने या सामन्यात ४०० हून अधिक धावांचा पल्ला पार केला आहे. यात सर्वात मोठे योगदान आहे ते चेतश्वर पुजाराचे. यामुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर मोठे लक्ष्य ठेवता येणार आहे. भारताने ४ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पुजाराच्या या दमदार खेळीमुळे भारतीय संघाला चौथ्या कसोटीसह मालिका विजयाचा इतिहास रचण्याची संधी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.