HW News Marathi
क्रीडा

माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन मुंबईत

मुंबई | जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले असून मिक्स मार्शल आर्ट्स (एमएमए) कुमिते – १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर ला करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच भारत दौ-यावर आलेल्या टायसन यांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मुंबई विमानतळावरच गर्दी केली होती.

आॅल इंडिया मिक्स मार्शल आर्ट्स फेडरेशन (एआयएमएमएएफ) आणि वर्ल्ड किक बॉक्सिंग नेटवर्क (डब्ल्यूकेएन) यांच्या मान्यतेने होत असलेल्या या लीगसाठी माईक टायसन मुख्य चेहरा म्हणून उपस्थित राहणार आहे. या लीगची पहिली ‘नाइट फाइट’ २९ स्पटेंबरला वरळी येथील एनएससीआय डोम बंदिस्त स्टेडियममध्ये होईल. यावेळी भारत विरुद्ध यूएई अशा लढतीने या लीगला सुरुवात होईल. मुख्य म्हणजे सांघिक स्तरावर होणारी ही लीग एमएमए खेळाच्या इतिहासातील पहिली सांघिक स्पर्धा ठरणार आहे.

एकूण ८ देशांचा सहभाग असलेल्या या लीगमध्य यजामन भारतासह यूएई, रशिया, चीन, अमेरिका, यूके, पाकिस्तान व बहारीन या देशांचा सहभाग असेल. प्रत्येक संघात ९ खेळाडूंचा समावेश असून त्यात एका महिला खेळाडूचा समावेश अनिवार्य असणार आहे. तसेच एमएमए खेळाची गुणपद्धत सामान्य प्रेक्षकांना कळणे अवघड असते तेव्हा ती कळण्यासाठी या लीगच्या आयोजकांनी विशेष प्रणाली तयार केली आहे. ज्यात लाइव्ह गुणपद्धत दाखविण्यात येणार आहे. एमएमए खेळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी लाइव्ह गुणपद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक बुधवानी यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kargil Vijay Diwas : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘या’ २ संघात रंगणार फुटबॉल सामना

News Desk

ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन  

News Desk

बेल्जियमने जर्मनीवर २-१ मात करत उपांत्य फेरीत दिली धडक

News Desk