HW News Marathi
क्रीडा

शिक्षणासोबत खेळालाही महत्व द्या- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

विनोद तायडे , वाशिम- शिक्षण हे महत्त्वाचे आहेच. मात्र, त्यासोबतच खेळालाही जीवनात तितकेच महत्व देण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुद्देशीय सभागृहात स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त आज आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, सेवा निवृत्त क्रीडा शिक्षक आर. आर. पवार, खोब्रागडे, जिल्हा क्रीडा परिषदचे सदस्य धनंजय वानखेडे, संजय शिंदे, डॉ. भागवत महाले, किसान सोनटक्के आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, मुलांना लहानपानापासून एखाद्या खेळामध्ये रुची असल्यास पालकांनी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाला महत्त्व आहेच, पण सदृढ शरीर व कार्यक्षम मेंदू घडविण्यासाठी खेळ सुध्दा अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना केवळ अभ्यासाची सक्ती न करता, त्यांच्या अभिरुचीनुसार, आवडीनुसार एखाद्या खेळातील कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तरच भविष्यात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणारे खेळाडू तयार होतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत जालन्याच्या किशोरची बाजी!

News Desk

प्रणव धनावडेचा विश्वविक्रम आता सीबीएसईच्या पाठ्यपुस्ताकात

swarit

भारताची फुलराणी सायना नेहवाल हिच्या हाती भाजपचा झेंडा

swarit