HW News Marathi
क्रीडा

भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, बीसीसीआयने विराटला सुनावले

मुंबई । ‘भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, पैसे कमावतोस, हे विसरू नकोस’ अश्या शब्दात बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला सुनावले. विराट कोहली वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. विराटने एका चाहत्याच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता. त्याचे हे विधान क्रिकेट चाहत्यांना आवडले नाही. आणि त्यांनी त्याला सोशल मीडियावरून चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने विराटला सुनावले आहे.

विराट कोहलीने केलेले वादग्रस्त विधान

भारतीय फलंदाजांच्या तुलनेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ अधिक आनंददायी असतो, असे एका चाहत्याने लिहिले. या विधानाला उलट उत्तर देताना विराट म्हणाला की, ”तुम्ही भारतात राहू नका. तुम्हाला दुसरे देश आवडतात, मग तुम्ही आमच्या देशात का राहता?”

https://twitter.com/Hramblings/status/1059718366288637953

बीसीसीआयचे उत्तर

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,” ते उत्तर म्हणजे मुर्खपणाच म्हणावे लागेल. त्याने असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा. भारतीय चाहते गुंतवणूक करतात म्हणून कोहलीला पगार मिळतो, पैसे कमावतो, हे त्याने ध्यानात ठेवायला हवे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रविंद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार तर दीपा मलिक, बजरंग पुनिया यांना ‘खेलरत्न’

News Desk

फ्रान्समधील टेनिस स्पर्धेत रुईयाचा विश्वजीत सांगळे विजयी

News Desk

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ | सांघिक नौकानयनात भारताची सुवर्ण कामगिरी

News Desk
देश / विदेश

चीनचा अनोखा आविष्कार, बातम्या सांगणारा अँकर रोबो

News Desk

नवी दिल्ली । चीनमधील एका वृत्तसंस्थेने चक्क बातम्या सांगणारा रोबो तयार केला आहे. तो रोबो हुबेहुब माणसासारखा दिसतो आणि तो तसाच बोलतो सुद्धा आहे. त्या रोबोच्या चेहऱ्यावरील हावभाव हे पाहिले की तो रोबो आहे की मनुष्य हेच कळतच नाही. इंग्रजी भाषेत बातम्या सांगणाऱ्या रोबोचे नाव झँग झाओ आहे. चीनच्या झिनुआ वृत्तसंस्थेने आर्टिफिशिअल इंटलिजन्स असणाऱ्या अँकर रोबोचे टीव्हीवर पदार्पण केले आहे.

&

nbsp;

झिनुआ न्यूज एजन्सी आणि चीनमधील सर्व इंजिन सोगोऊ डॉट कॉम यांनी संयुक्तरित्या या रोबो अँकरची निर्मिती केली आहे. “तो रोबो रिपोर्टिंग टीमचा सदस्य झाला आहे. तसेच तो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २४ तास कार्यरत असेल. शिवाय बातम्यांची प्रॉडक्शन कॉस्ट करुन कार्यक्षमतेत सुधारणा होईल,”असे झिनुआचे म्हणणे आहे. या आधीही झिनुआ वृत्तसंस्थेने अँकर रोबो तयार केला होता. पण त्याचा लूक बरा नसल्याने त्यांनी पुन्हा नव्याने हा रोबो बनवला आहे.

Related posts

रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच रावसाहेब दानवे लोकल प्रवासाबद्दल म्हणाले…

News Desk

कॅबिनेट बैठक, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी आम्ही सर्व नियमांचे पालन केले आहे !

News Desk

बहुमत न मिळाल्यास भाजपाला बसपा ने पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

News Desk