HW Marathi
क्रीडा

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताचा १८ धावांनी पराभव

मॅन्चेस्टर | आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव करत न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांच्या  आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघचा २२१ धावांमध्ये कढल्या आहेत. भारताचा १८ धावानी पराभव झाला. परंतु रवींद्र जाडेजा आणि एम.एस.धोनीने १०० धावांची भागिदारी करत विजयाच्या आशा जागवल्या होत्या. परंतु जाडेजा ७७ आणि धोनी ५० धावांवर बाद झाल्यावर भारतीय संघाच्या विजयाच्या आशाही मावळल्या.

तत्पूर्वी मंगळवारी (९ जुलै) खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंड विरूद्ध भारत सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अर्धवट राहिला होता. काल पाऊस आला, तेव्हा न्यूझीलंडच्या ४६.१ ओव्हरमध्ये ५ बाद २११ धावा झाल्या होत्या. हा सामना काल जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने धारधार गोलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव ८ बाद २३९ धावांवर रोखला.

 

 

Related posts

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ | सांघिक नौकानयनात भारताची सुवर्ण कामगिरी

News Desk

पाकिस्तान-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यात नेमके काय घडले ?

Shweta Khamkar