HW News Marathi
क्रीडा

‘आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ शिवाजी पार्कमध्ये साजरा होणार…

मुंबई | आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ म्हणून १५ जून हा विविध देशात साजरा केला जातो. मल्लखांबाचे विद्यार्थ्यां दादरच्या शिवाजी पार्कात विविध प्रकारच्या मल्लखांबावरील आकर्षक उड्यांचे प्रात्यक्षिक आज रात्री ८ वाजता मल्लखांबच्या चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत.

‘मल्लखांब’ हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा पारंपारिक खेळ असून सुमारे २०० वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा काळात महाराष्ट्रात कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून जन्माला आलेला मल्लखांब हा खेळ आहे. आज हा खेळ केवळ महाराष्ट्र आणि भारता पुरता मर्यादीत न राहता. देशाच्या सीमारेषा ओलांडून अनेक परदेशातमध्ये जाऊन पोचला आहे.

मल्लखांब हा खेळ लाकडी खांबवर तसेच दोरीवर खेळला जातो. मल्लखांबामुळे एकाग्रता, लवचिकता, ताकद, तोल तसेच शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. मल्लखांब हा कमीत कमी वेळात शरीराच्या जास्तीत जास्त अवयवांना व्यायाम देणारा एकमेव क्रीडा प्रकार आहे.

मल्लखांबाचा आनंद अनुभवण्यासाठी श्री समर्थ व्यायाम मंदिरानी शिवाजी पार्क येथे आज सकाळी ५ ते १० तसेच सायंकाळी ५ ते १० या वेळेत मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी वयोमर्यादा नाही. मल्लखांबावरील विविध उड्यांचे मार्गदर्शन दिले जाईल. संस्थेचा मुख्य हेतू मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

क्रिकेट घोटाळ्याप्रकरणी फारुख अब्दुलांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र

swarit

राज्य शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत १००० स्पर्धक सहभागी होणार

Gauri Tilekar

ई-स्पोर्ट्स स्पर्धेत मुंबईची सिग्निफाय पुढच्या फेरीत  

News Desk
मुंबई

मुंबईकरांचे पाणी महागले

News Desk

मुंबई | मुंबईकरांचे पाणी महागले आहे. स्थायी समितीने गुरुवारी पाणीपट्टी दरात महापालिकेकडून ३.७२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टी दर वाढीच्या निर्णयाची अंमबलबजावणी १६ जूनपासून करण्यात येणार आहे. यामुळे घरगुती पाणीपट्टीत प्रति १ हजार लिटर्स मागे ४ रुपये ९१ पैशांवरून ५ रुपये ९ पैसे वाढ होणार आहे.

पाण्याचे वाढीव दर

  • घरगुती ग्राहक
  1. जुने दर – ३.६८ रुपये
  2. नवे दर – ३.८२ रुपये
  • झोपडपट्या व आदिवासी पाडे
  1. जुने दर – ४.०८ रुपये
  2. नवे दर – ४.२३ रुपये
  • इतर घरगुती ग्राहक
  1. जुने दर – ४.९१ रुपये
  2. नवे दर – ५.०९ रुपये
  • बिगर व्यावसायिक संस्था
  1. जुने दर – १९.६७
  2. नवे दर – २०.४०
  • व्यावसायिक संस्था
  1. जुने दर – ३६.८८
  2. नवे दर – ३८.२५
  • उद्योग, कारखाने इ.
  1. जुने दर – ४९.१६
  2. नवे दर – ५०.९९
  • रेसकोर्स, तारांकीत हॉटेल्स
  1. जुने दर – ७३.७५
  2. नवे दर – ७६.४९
  • शीतपेये, बाटलीबंद पाणी उत्पादक
  1. जुने दर – १०२.४४
  2. नवे दर – १०६.२५

Related posts

मुंबईतलं जिना हाऊस तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा – आ. लोढा

News Desk

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमास एन वॉर्ड मधून आजपासून सुरुवात

Aprna

घाटकोपर विमान दुर्घटना आणि ते दोघे

News Desk