HW News Marathi
क्रीडा

आंतरराष्ट्रीय धावपटू परविंदर चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय खेळाडू परविंदर चौधरीने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घडना घडली आहे. ही घटना बुधवारी घडली असून गोंडा येथील कॅमथल थाना येथील परविंदर हा जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील अॅथलीट अकादमीत राहत होता. त्याने हॉस्टेलच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

सोमवारी सकाळी वडिलांशी त्याचे फोनवर भांडण सुरू झाले होते. त्यानंतर त्याची बहीण येथे आली होती आणि तिने त्याच्याशी चर्चा केली होती. दुर्दैवाने आम्ही त्याला वाचवू शकलो नाही,अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पक्षपात बाजूला ठेवून ऊसतोड कामगार बांधवांची पारदर्शक पद्धतीने नोंद व्हावी – धनंजय मुंडे

News Desk

राज्य शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत १००० स्पर्धक सहभागी होणार

Gauri Tilekar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna
मुंबई

अंधेरीमधील एसआरएच्या इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू

News Desk

मुंबई | अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील कदम नगर एसआरएच्या २२ मजली इमारतीला मंगळवारी (१३ नोव्हेंबर)ला रात्री ८. ३० च्या सुमारास लागली होती. ही आग १० आणि ११ व्या मजल्यावर लागली असून या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी अग्निशमन दलाचे दाखल झाले. रहिवासी इमारत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी १० आणि ११ व्या मजल्यावर अडकलेल्या ५ पैकी ३ जणांना सुखरूप वाचवले आहे. तर दोन जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.

या इमारतीच्या १० व्या मजल्यावरील १००१ क्रमांकाच्या फ्लॉटमध्ये ही आग लागली होती. या आगीत इलेक्ट्रीक शॉर्टसर्किट झाल्याने लाकडी फर्निचर आणि इतर घरातील वस्तुंमुळे आग ११ व्या मजल्यापर्यंत पसरली. तसेच २१ व्या मजल्यालाही काही झळा बसल्या. १००१ या फ्लॅटमधील हॉलमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. विकी शर्मा (२५), सागर शर्मा (०७) असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे असून लालकृष्ण शर्मा (५०) हे ३० टक्के भाजले गेले आहेत. लालकृष्ण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे.

Related posts

मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने नो गो झोनमध्येही वाढ

News Desk

सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून चुकीचे पायंडे पाडू नका; अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल

Aprna

प्रभाग क्रमांक 56 मध्ये महिला पत्रकार दीप्ती यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा

News Desk