नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. वैद्यकीय तपासणीत पृथ्वी शॉला विश्रांती घेण्याची आवश्यकता असून तो या कसोटीत खेळण्यासाठी अद्याप तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पृथ्वी शॉला या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही.
UPDATE: Prithvi Shaw ruled out of first Test against Australia in Adelaide. Full details here —> https://t.co/bKZRSodVyR pic.twitter.com/gqFWUJKxNf
— BCCI (@BCCI) November 30, 2018
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान, सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने ६९ चेंडूत ६६ धावांची अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळणार हे निश्चित होते. मात्र सराव सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला ही कसोटी खेळता येणार नाही. यामुळे आता भारतीय क्रिकेट संघाची चिंता वाढली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.