HW News Marathi
क्रीडा

सचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांचे निधन

मुंबई | क्रिकेट विश्वातील देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला घडविणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचे आज (२ जानेवारी) निधन झाले आहे. आचरेकर हे ८७ वर्षाचे होते. आचरेकरांनी सचिनसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले आहे. त्यांनी घडविलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. आचरेकरांच्या जाण्याने भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. आचरेकरांना भारत सरकारकडून पद्मश्री तसेच द्रोणाचार्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

रमाकांत आचरेकरांचा अल्प परिचय

आचरेकरांचा जन्म १९३२ रोजी झाला असून १९४३ साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १९४५ मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी यंग महाराष्ट्रा एकादश. गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी केवळ एक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. १९६३-६४ साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलेचा चालत्या ट्रेनखाली आत्महत्येचा प्रयत्न

swarit

हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा

News Desk

‘आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ शिवाजी पार्कमध्ये साजरा होणार…

News Desk