HW News Marathi
क्रीडा

लंच आधी शतक करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

बंगळुरु | बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरोधात सुरु असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी केली आहे. लंच आधी शतक करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या यादीत सहावे स्थान मिळवण्यात यश आले आहे.

या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला. धवनने आधी ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मग त्याने धावगती वाढवत अवघ्या ८७ चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याच्या शतकाला १८ चौकार आणि तीन खणखणीत षटकारांचा साज होता. यानंतर शिखर धवन ९६ चेंडूत १०७ धावा करुन माघारी परतला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विराट कोहलीचा मोठा निर्णय, कर्णधारपद सोडणार!

News Desk

Mumbai Marathon 2019 | मुख्य मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग रावत विजयी

News Desk

कराटे चॅम्पियनशिपमध्ये चिमुकल्या भार्गवी संखेची उत्कृष्ट कामगिरी

News Desk