HW News Marathi
क्रीडा

महिलेचा चालत्या ट्रेनखाली आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – हार्बर मार्गावरील टिळक नगर स्थानकावर एक महिलेने चालत्या ट्रेन खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेचे नाव शारदा फुलवते ( 24) असे असून आरपीएफ पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीवीत कैद झाला.

शारदा फुलवते यांनी २१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता रेल्वे फलाटावर येत असलेल्या लोकल

ट्रेन येत असलेल्याचे दिसताच क्षणी शारदा हिने रेल्वे ट्रॅकवर उडी मारून ट्रेनसमोर उभी राहिली होती. लोकल ट्रेनच्या मोटरमनला ट्रॅकवर महिला उभी असल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावल्याने दुर्घटना टळली होती.

या संदर्भात आरपीएफ पोलिसांनी शारदा फुलवते तिला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर कळाले की, ‘शारदाला सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने म्हटले’. या संदर्भात शारदा हिच्या विरोधात रेल्वे कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रशिक्षक रमेश पोवार यांचा ३ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण

News Desk

‘आशिया चषक २०१८’वर भारताने कोरले आपले नाव

News Desk

ई-स्पोर्ट्स स्पर्धेत मुंबईची सिग्निफाय पुढच्या फेरीत  

News Desk