HW News Marathi
क्रीडा

सचिन तेंडुलकर धोनीच्या मदतीला धावून आला

मुंबई । इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताला २-१ ने पराभव स्विकारावा लागला. या मालिकेत महेंद्रसिंह धोनीने अपेक्षित असे रन काढले नाही. तसेच सामना संपल्यानंतर त्याने पंचांकडून बॉल मागितला. यावरून धोनी आता वन डे सिरीजमधून निवृत्त होणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या. या चर्चांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही महेंद्रसिंह धोनीच्या मदतीला धावून आला आहे. धोनीने कधी निवृत्त व्हायचे हा पूर्णपणे त्याचा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय त्याच्यावरच सोडा, असे सांगितले आहे.

दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय संघ ३२३ धावांचा पाठलाग करत असताना धोनीने मोक्याच्या क्षणी संथ खेळ करत ५९ चेंडूत अवघ्या ३७ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यातही धोनीला फारशी चमक दाखवता आली नाही. ६६ चेंडू खर्ची घालत धोनीने अवघ्या ४२ धावा काढल्या. तिसरा सामना संपल्यानंतर धोनी पंचांच्या हातातून चेंडू घेत असतानाची दृष्य सर्वत्र पसरली आणि यानंतर धोनी क्रिकेटला रामराम ठोकतो की काय अशा चर्चा रंगू लागल्या होता. यादरम्यान विराट कोहली, रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

आता दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरही महेंद्रसिंह धोनीच्या मदतीला धावून आला आहे. धोनीच्या निवृत्त होण्याच्या चर्चांवर कोच रवी शास्त्री यांनी पडदा टाकला होता. यानंतर सचिन तेंडुलकरने देखील धोनीची बाजू मांडली. धोनीला त्याचा खेळ माहित आहे. त्याची खेळातील प्रगती देखील तो जाणतो. त्यामुळे हा निर्णय त्यालाच घेऊ देणे योग्य आहे अशी प्रतिक्रिया मांडली. तसेच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी याआधीच धोनीला ताकीद दिली होती की, यापुढे चांगला परफॉर्मन्स दिला नाही तर मला दुसऱ्याला संधी द्यावी लागेल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन तेंडुलकर-शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

मराठमोळ्या सिद्धार्थने रचला इतिहास

Gauri Tilekar

पाकिस्तानसोबत न खेळून २ गुण देण्यापेक्षा मैदानात त्यांचा पराभव करा !

News Desk