HW News Marathi
क्रीडा

भारत-पाक क्रिकेट चाहत्यांचे अतुट नाते

दुबई । भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वाद सर्वांना माहिती आहे. गेल्या काही दिवसात सर्वांनीच भारत-पाक सीमेवर नेहमीच तणावाचे वातावरण असते. काही वेळे दोन्ही देशांकडून गोळीबारी देखील झाल्या आहेत. परंतु या दोन्ही देशांमध्ये भावनित नाते जोडणारे अनेक प्रसंग घडलेले पाहायला मिळाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक विजेत्या पाकिस्त२नच्या खेळाडू प्रती दाखवलेला आदर, हे सध्याच्या घडीचे ताजे उदाहरण आहे.

तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (१९ सप्टेंबर) क्रिकेट सामन्यापुर्वी ह्रदय स्पर्श असा प्रसंग समोर आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पाठीराखा सुधीर गौतम याच्या मदतीला पाकिस्तानचे चाचा धावून आले आहेत. भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी जगभर फिरणारा सुधीर आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला. परंतु आर्थिक चणचण भासल्यामुळे त्याला ही स्पर्धेसाठी युएईत दाखल होऊ शकत नव्हता. पण, शेजारी राष्ट्रातून त्याला मदतीचा हात आला. पाकचे क्रिकेट संघाचे कट्टर चाहते बाशीर चाचा (चाचा शिकागो)यांनी सुधीरला मदत केली. चाचाने सुधीरचा संपूर्ण युएई दौरा स्पॉन्सर केला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात सुधीर तिरंगा घेऊन रोहित शर्माच्या संघाला चिअर करताना दिसणार आहे.

सुधीर युएई दौ-यासाठी प्रायोजक मिळाले नाही. भारतीय संघाच्या चहात्याची अशी अवस्था झाल्याचे समजताच पाकच्या चाचाने कॉल करुन सुधीरचे या दौ-यातील वेळापत्रक जाणून घेण्यासाठी कॉल केला होता. तेव्हा सुधीरने सर्व आपबिती चाचाला सांगितली. यानंतर चाचाने त्वरित त्यांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.”हे मी प्रेमापायी केले आहे. पैसा येतो आणि जातो, पण आपल्यामधील प्रेम कायम राहते. सुधीर युएईत दाखल झाला आहे आणि त्याची सर्व काळजी आम्ही घेत आहोत. मी काही गर्भश्रीमंत नाही, परंतु माझे मने मोठ आहे. त्याला मदत केल्याने अल्लालाही आनंद झाला असेल,” असे बशीर चाचा यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईकर शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट संघात निवड

News Desk

India vs Pakistan | भारताचे हे शिलेदार करणार पाकिस्तानचा सामना

News Desk

क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

swarit
राजकारण

जात पडताळणीवरुन उद्धव ठाकरे कडाडले

News Desk

मुंबई | जातविरहित समाज, जातीअंताची लढाई, जातीय विषमतेविरुद्धचा लढा असे शाब्दिक बुडबुडे फोडायचे आणि जातींना कुरवाळत बसायचे, हेच ढोंग आपल्या देशात वर्षानुवर्षे सुरू आहे. कोल्हापुरातील 19 नगरसेवकांना जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी घरी पाठवणाऱ्या आदेशामुळे ‘माझी जात कंची’, असा प्रश्न आपल्या लाडक्या लोकशाहीलाही पडला असेल! असा सवाल आजच्या सामनाच्या अग्रलेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

सामनाचे आजचे संपादकीय

सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे आपल्या समाजातील सर्वाधिक आवडीचा ‘जात’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण कुठलेही असो, पण हल्ली देशभरातच जातीय भावना टोकदार झाल्या आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. जातीपातींवरून एकूणच समाजमन अस्वस्थ असताना, ढवळून निघाले असताना सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे जातीचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे. जात पडताळणीचे प्रमाणपत्र वेळेच्या आत सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या 19 नगरसेवकांचे पद रद्द केले. हे सर्व नगरसेवक लोकशाही मार्गाने जनतेमधून निवडून आले होते हे खरेच, पण त्यांचे पद गेले म्हणून सर्वोच्च न्यायालयालाही दोष देता येणार नाही. कारण शेवटी राज्यघटनेने घालून दिलेली चौकट आणि केंद्रीय सरकार व राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या कायद्यांचा अर्थ लावून त्याबरहुकूम निवाडा करणे एवढेच काम न्यायालयाच्या हाती असते. तेच काम कोल्हापूरच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केले. महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल ऍक्टच्या कलम 9 नुसार राखीव जागांवरून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसेल तर ते सहा महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र सहा महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र निवडून आलेल्या उमेदवाराने आयोगाकडे सादर केले नाही तर त्याचे पद

आपोआप रद्द करण्याची तरतूद

या कायद्यातच करण्यात आली आहे. आता कायदाच असा आहे म्हटल्यावर सर्वोच्च न्यायालयावर खापर फोडण्यात तरी काय हशील! ते काही असो, परंतु ज्या लोकशाही व्यवस्थेचा आपण ऊठसूट उदो उदो करीत असतो त्याच लोकशाहीत जनतेच्या कौलापेक्षाही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची ‘जात’ आणि त्यांच्याकडे ‘असलेले’ किंवा ‘नसलेले’ जातीचे प्रमाणपत्र हे अधिक प्रभावी ठरते. कोल्हापूर प्रकरणात तेच घडले. लोकशाहीतील सर्वात मोठी कसोटी असलेली ‘निवडणूक’ निप्रभ ठरली आणि जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्दय़ावरून 19 लोकप्रतिनिधींचे नगरसेवकपद एका फटक्यासरशी काढून घेण्यात आले. पुन्हा हा विषय आता केवळ कोल्हापूरच्या 19 नगरसेवकांपुरता मर्यादित राहणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही निकाल हा अंतिम शब्द ठरतो आणि एका प्रकरणातील निकाल पुढील असंख्य प्रकरणांसाठी जसाच्या तसा लागू केला जातो. याचा अर्थ स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या हजारो लोकप्रतिनिधींना या निकालाचा फटका बसू शकतो. ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांचे सदस्य, नगरपालिका, महापालिकांचे नगरसेवक अशा हजारो लोकप्रतिनिधींपैकी काही हजार निर्वाचित उमेदवार या बडग्यामुळे उद्या अपात्र ठरतील. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यास विरोध असण्याचे कारण नाही. पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची जात खरी की खोटी, त्यांचे प्रमाणपत्र वैध की अवैध हे तपासणारी सरकारी यंत्रणा किती सक्षम आहे, पडताळणी समित्यांकडे गेलेले

अर्ज वर्षानुवर्षे का लटकून

पडतात, याचा विचार कोणी करायचा? सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर अशा प्रत्येक ठिकाणी नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे आधीच सदैव कुठल्या ना कुठल्या निवडणुकीत बुडालेल्या या देशात जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींच्या हजारो रिक्त जागांवर पोटनिवडणुकांचा सपाटा सुरू करावा लागेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचे राजकीय आडाखे बांधण्यापेक्षा जात प्रमाणपत्रांमुळे पुनः पुन्हा पोटनिवडणुका घेण्याची थेरं हिंदुस्थानसारख्या गरीब देशाला परवडणारी आहेत काय, याचा विचार सत्तेतील धुरिणांनी करायला हवा. ज्या महाभागांनी जातीचे बोगस प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली त्यांना सहानुभूती दाखवण्याची मुळीच गरज नाही. त्यांच्यावर कायद्यानुसार जी काही कारवाई असेल ती जरूर करा, पण या आधुनिक युगात जातीच्या पलीकडे जाऊन आपण कधी विचार करणार आहोत की नाही? जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, शिक्षणापासून नोकरीपर्यंत आणि जनगणनेपासून राजकारणापर्यंत सगळीकडेच ‘जात’ चवीने चघळत बसायची आणि वर पुन्हा ‘आम्ही जातीयवादाविरुद्ध आहोत’ असे सांगायचे, हे थोतांड आहे. जातविरहित समाज, जातीअंताची लढाई, जातीय विषमतेविरुद्धचा लढा असे शाब्दिक बुडबुडे फोडायचे आणि जातींना कुरवाळत बसायचे, हेच ढोंग आपल्या देशात वर्षानुवर्षे सुरू आहे. कोल्हापुरातील 19 नगरसेवकांना जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी घरी पाठवणाऱ्या आदेशामुळे ‘माझी जात कंची’, असा प्रश्न आपल्या लाडक्या लोकशाहीलाही पडला असेल!

 

 

Related posts

विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने कशी असतील राज्यातील समीकरणे ?

News Desk

ठाकरे कुटुंबियांच्या बेहिशेबी संपत्तीसंदर्भातील याचिका न्यायालयाने ‘या’ कारणामुळे फेटाळली

Aprna

देशातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मोदीच योग्य हे शेवटी जनतेने मान्य केले !

News Desk