HW News Marathi
क्रीडा

भारतीय मुलाने बुद्ध्यांक परीक्षेत आइनस्टाइनला टाकले मागे

लंडन-ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या मुलाने मेन्सा बुद्ध्यांक चाचणीत १६२ गुण मिळवत प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि अल्बर्ट आइनस्टाईन यांनाही मागे टाकले आहे. अर्णव शर्मा असे या मुलाचे नाव आहे. ही परीक्षेची पूर्ण तयारी न करता अर्णवने हे यश मिळवले हे विशेष.

अर्नवला नृत्य आणि संगीत विषयात विशेष रस आहे. वयाच्या आठव्या वर्षी तो एका प्रसिद्ध डान्स शोच्या उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचला होता. याव्यतिरिक्तही स्विमिंग, बँडमिंटन, पिआनोची त्याला विशेष आवड आहे. जगभराचे संपूर्ण भौगोलिक माहिती त्याच्या तोंडपाठ आहे. अर्णव याच्या यशामुळे त्याला ब्रिटीश मेन्साचे सदस्यत्वही मिळाले आहे. भारतीयांसाठी ही अतिशय गौरवाची बाब म्हणायाला हवी. काही दिवसांपूर्वी राजगौरी पवार या केवळ १२ वर्षांच्या विद्यार्थिनीने देखील या चाचणीत स्टीफन हॉकिंग यांना मागे टाकत १६२ गुण मिळवले होते. स्टीफन हॉकिंग आणि आइनस्टाइनचा बुद्धयांक १६० असल्याची नोंद आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुस्तीपटू बजरंग पुनिया ६५ किलो गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी

Gauri Tilekar

पक्षपात बाजूला ठेवून ऊसतोड कामगार बांधवांची पारदर्शक पद्धतीने नोंद व्हावी – धनंजय मुंडे

News Desk

फुटबॉलपटू रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप

swarit