HW News Marathi
क्रीडा

क्रीडा दिनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची अनोखी भेट

पुणे | पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे,म्हणून विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या रकमेत सुमारे ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने एक प्रकारे भेट मिळाली आहे असेच म्हणावे लागेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अहमनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना नेहमीच खेळांसाठी प्रोत्साहन दिले जाते.

विद्यापीठाच्या वतीने २००७ पासून अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर व अश्वमेध स्पर्धेत पदक पटकाविणा-या विद्यार्थ्याला शिष्यवृती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी या शिष्यवृत्तीचा दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. शिष्यवृत्तीच्या रकमेतून विद्यार्थ्यांना खेळासाठी आवश्यक साहित्य व प्रशिक्षण घेता येते. त्यामुळे ही शिष्यवृत्ती या खेळाडूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची समजली जाते.

विद्यापीठाकडून मिळणारी ही रक्कम कमी असल्याने त्यात वाढ करावी, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर सकारात्मक चर्चा झाली असून, शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय बर्वे  मुंबई पोलीस आयुक्त तर सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक पदी नियुक्त

News Desk

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ‘किटअप’ चॅलेंज

News Desk

अजिंक्य रहाणेचा अपमान, बीसीसीआयच्या फोटोमुळे नव्या वादाला तोंड

swarit