HW News Marathi
क्रीडा

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप

इंग्लंड | इंग्लंड विरुद्ध भारतमध्ये कसोटी सामने खेळले जात आहेत. या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक अशी दमदार कामगिरी केली. विराटच्या या दमदार कामगिरीमुळे आयसीसी कसोटी रँकिंगच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

विराटने बॉल टेम्परिं प्रकरणामुळे सध्या निलंबित असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टिव्हन स्मिथला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. स्मिथने २०१५ पासून आयसीसी कसोटी रँकिंगच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली होती. यापुर्वी आयसीसी कसोटी रँकिंममध्ये भारतीय क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यानंतर आता विराट कोहली यांनी देखील या क्रमवारीच्या यादी आपल्या नावाची नोंद केली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने पहिल्या डावात १४९ आणि दुसऱ्या डावात अर्धशतक अशी धमाके दार खेळी केली होती. या कामगिरीमुळे विराटला ३१ गुण मिळाले.

Related posts

चौथ्यांदा विजेतेपद भूषविणाऱ्या मुंबई इंडियन्सची आज मिरवणूक

News Desk

उसेन बोल्टचे व्यावसायिक फुटबॉल विश्वात पदार्पण

News Desk

सचिन तेंडुलकरने केली धोनीची पाठराखण

swarit