HW News Marathi
क्रीडा

वेस्ट इंडिजला पुन्हा झटका

पुणे । भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचे दोन गडी ४० धावांतच तंबूत परतले आहेत. यजमान भारतीय संघाने सध्या १-० अशी आघाडी या मालिकेत घेतली आहे. आजचा सामना जिंकून मालिकेतील आघाडी वाढवण्याचा प्रयत्न विराट कोहलीच्या टीम इंडियाचा असेल, तर पाहुणा वेस्ट इंडिज संघ आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात पाहुण्यांचा विजय थोडक्यात हुकला होता. दुसरा सामना बरोबरीत सोडवण्यात वेस्ट इंडिजयला यश आले होते.

हेटमेयर आणि होप यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर विंडीजने या सामना टाय राखण्यात यश मिळवले. मालिकेतील सलग दुसरे शतक हेटमेयरचे थोडक्यात हुकले. तर होपने मात्र शानदार शतकी खेळी करून विंडीजला सामन्यात बरोबरी करून देण्यात मोठी भूमिका बजावली. सामनात बरोबरीत सुटल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नोंदवलेले अनेक विक्रम झाकोळले गेले. त्याने वनडे सामन्यात सर्वात वेगवान १० हजार धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला होता.या मालिकेत विराट चांगलाच फॉर्मात असून, आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यात त्याने शानदार शतके फटकावली आहेत. त्याच्या नावावर २९७ धावांची नोंद झाली आहे. शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाने पुन्हा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केल्यामुळे भारतीय गोलंदाजीची ताकद अधिक वाढली आहे.

त्यामुळे विंडीज संघ या दोघांचा कसा मुकाबला करतो हे बघणे महत्वाचे ठरेल. या दोघांच्या गैरहजेरीत विंडीज संघाने भारतीय गोलंदांजाचा चांगला समाचार घेतला आहे. पहिल्या दोन सामन्यात विंडीजने यशस्वी टप्पा गाठला. त्यांचा हेटमेयर चांगला फॉर्मात असून, त्यानेही दोन सामन्यात २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अंबाती रायडूने चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करून आपले संघातील स्थान निश्चित केले आहे. पण ५, ६ आणि ७ या क्रमांकावर सातत्याने चांगली फलंदाजी करणारे फलंदाज भारतीय संघाला अद्याप मिळाले नाहीत.

पुढल्या वर्षी विश्वचषक स्पर्धा होत असताना आणि त्याअगोदर जेमतेम आता १६ वनडे सामन्यात भारतीय संघ खेळणार असताना भारतीय संघासाठी ही गोष्ट निश्चित चांगली नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. माजी कर्णधार धोनीला अद्याप फलंदाजीत सूर गवसत नसल्यामुळे त्याचेही संघातील स्थान धोक्यात आले आहे. त्याचा युवा सहकारी ऋषभ पंतकडून भारतीय संघ मोठ्या धावसंख्येची अपेक्षा बाळगून असेल. पांढरा चेंडू हाताळताना फिरकी गोलंदाज चहल आणि यादव यांनादेखील जड जात आहे. विंडीजचे युवा फलंदाज पॉवेल, चंद्रपॉल, सॅम्युअल यांना अद्याप सूर गवसला नाही. राहिलेल्या सामन्यात ते चांगली कामगिरी करतील, अशी आशा संघ व्यवस्थापन करत असेल. विंडीज कर्णधार होल्डर आणि थॉमस हे दोघेदेखील गोलंदाजीत अपयशी ठरेल आहेत. त्यांच्याकडून विंडीज संघ राहिलेल्या सामन्यात बर्‍यापैकी कामगिरीची अपेक्षा बाळगत असेल. दुसरा सामना टाय झाल्यामुळे विंडीज संघाचे मनोर्धेर्य निश्चित उंचावले असेल. त्यामुळे आजची ही लढत रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 आमच्यावर टीका करा पण स्टेडियममध्ये या

News Desk

सईचे ‘कोल्हापुरी मावळे’

Gauri Tilekar

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk