HW News Marathi
मनोरंजन

या दिवाळीत असे बनवा बेसनाचे लाडू

दिवाळीच्या फराळातील सर्वांचाच आवडता असा पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू. प्रत्येक घरात बेसनाचे लाडू करण्याची पद्धत कमी-अधिक प्रमाणात सारखीच असते. यात विशेषतः साजूक तुपाचा वापर केला जातो. परंतु, तुम्ही कधी दुध घालून केलेले बेसनाचे लाडू बनविले आहेत का ? या दिवाळीत दूध घातलेले बेसनाचे लाडू करून पहाच.
साहित्य:-
१ १/२ कप बेसन
पाऊण कप तूप (वितळवलेले)
३/४ कप पिठी साखर
१/२ टिस्पून वेलचीपूड
३ टेस्पून दूध
सुका मेवा (आवडीनुसार)
कृती:-
बेसन तूपामध्ये मध्यम आचेवर ३५ ते ४० मिनीटे भाजून घ्यावे. बेसन भाजत असताना सारखे ढवळत राहावे.
लाडू दुध न घालता कसा बनवाल :-
  • बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले की गॅस बंद करावा. बेसन पूर्ण गार होवू द्यावे. साधारण २ तास तरी साखर घालू नये.
  • नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार साखर घालावी.
  • निट मिक्स करून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.
  • तरीही बेसन गरम असतानाच थोडे दुध घातले तर शक्यतो लाडू चुकत नाहीत. त्याची कृती पुढीलप्रमाणे.
लाडू दुध घालून कसा बनवाल :-
  • बेसन व्यवस्थित भाजले गेले आणि खमंग वास आला कि गॅस बंद करावा आणि दुधाचा हबका मारावा.
  • यामुळे बेसन चांगले फुलेल (आधी फसफसेल) आणि घट्टसर होईल. हे बेसन लगेच दुसर्‍या भांड्यात काढून ठेवावे.
  • साधारण २० मिनीटांनी यात सुका मेवा, वेलचीपूड आणि साखर घालून हलके मळून ठेवून द्यावे. गार झाले कि लाडू वळावेत.
टिप:-
हे लाडू १५ ते २० दिवस सहज टिकतात. फक्त बेसन गरम असतानाच दुधाचा हबका मारावा.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजात विष पेरले गेले !

News Desk

welcome2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी सजले देशाचे महाद्वार

News Desk

राम मंदिरापेक्षा गरीबाच्या पोटात दोन घास जाणे महत्वाचे | नाना पाटेकर

News Desk