HW News Marathi
क्रीडा

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराला सुरुवात

मॉस्को | आज गुरुवारी होणाऱ्या सौदी अरब विरुद्ध रशिया या सामन्याद्वारे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महिनाभर रंगणा-या या सामन्यांमध्ये तब्बल ३२ संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. आज पासुन २१ व्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या थराराला सुरुवात होणार आहे.

काही तासांवर आलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे . यजमान रशिया पूर्णपणे फुटबॉलमय झाले असुन विश्वचषक सामन्यांची सुरुवात यजमान रशिया आणि सौदी अरबविरुद्ध सामन्याने होईल.रशियातील सर्वच ११ यजमान शहरांमध्ये चाहत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली असुन एक महिना रंगणा-या या फुटबॉल मेळाव्याचा पहिला सामना लुजनिकी स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार असुन या स्टेडियमची क्षमता ६० हजार प्रेक्षक एवढी आहे.

रशिया फुटबॉल संघाचे महासंचालक अलेक्झेंडर अलीवने जगातील प्रशंसकांना अपील केली की, विश्वचषकाला आता सुरुवात होईल. हे एक महत्त्वपूर्ण आयोजन आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. चला, एकजूट होऊन या स्पर्धेला सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करुया. आशा आहे की, रशियाचा संघ या विश्वचषकात शानदार प्रदर्शन करेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

India vs Pakistan | भारताचे हे शिलेदार करणार पाकिस्तानचा सामना

News Desk

‘भारत आर्मी’ अॅडलेड येथे दाखल, जडेजा-भुवनेश्वर कुमारने दिली भेट

News Desk

खार जिमखान्याने रद्द केले हार्दिक पंड्याचे मानद सदस्यत्व

News Desk