HW News Marathi
Uncategorized

कांद्याला अडीच हजारांवर दर!

वंत : दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाला कांद्याने हात दिला आहे. कांद्याला अडीच हजारांपेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी खुशीत आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला हंगामातील सर्वाधिक २,६९१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तसेच लासलगाव बाजार समितीत तब्बल २६५० रुपयांचा भाव मिळाला.

दरम्यान, आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही तासांतच कांद्याचा भाव पाचशे रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे लासलगाव येथे काही काळ लिलाव बंद पडले होते. दुपारपर्यंत ६०३ वाहनातील कांद्याचे लिलाव झाले. त्यानंतर व्यापाऱ्यांनीकमाल भाव १७५० रुपये पुकारण्यास सुरुवात केली. दरात ९५० रूपयांची घट झाल्याचे लक्षात येताच संतप्त शेतकºयांनी लिलाव बंद पाडले.

गुजरातमधील अतिवृष्टी आणि मध्य प्रदेशातील दीड लाख टन कांदा खराब हवामानामुळे सडल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. महाराष्ट्रातील खरीप कांदा बाजारात येईपर्यंत किमान तीन महिने तरी भावात स्थिरता राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर उपबाजार समितीत २,६५५ रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. सरासरी भाव २००० ते २५०० रुपये असा राहिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जागतिक अवयवदान विशेष : औरंगाबादेत २० महिन्यांत १२ जणांचे दान

News Desk

आदिती दिसणार अंजलीच्या भूमिकेत

News Desk

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून नौदलाचे अभिनंदन

swarit