HW News Marathi
Uncategorized

खेळाडू दारू प्यायल्याने भारत हारला

मुंबई: काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला होता. या पराभवामुळे भारतीय संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता या टीकाकारांमध्ये राखी सावंतची भर पडली आहे. राखीने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली आणि टीम इंडियातील खेळाडूवर जोरदार टीका केली आहे. अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी खेळाडूंनी जास्त दारू प्यायल्यामुळेच भारतीय संघाने हा सामना गमावला. त्यामुळेच दुसºया दिवशी या खेळाडूंना जास्त धावा करता आल्या नाहीत, असा थेट आरोप राखीने केला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर राखीने खूपच आगपाखड केली आहे. संपूर्ण भारत विराट कोहलीच्या प्रेमात आहे. भारतीय संघ अंतिम सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. मात्र, झाले उलटेच, पाकिस्तानी संघाने आपला १८० धावांनी पराभव केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कडून रत्नागिरी जिल्ह्यातील ८६ रोजंदारी कर्मचाऱ्याचं निलंबन

News Desk

Budget 2019 : सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसह घर खरेदीमध्ये दिली ऐवढी सूट

News Desk

अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची दडी, खरिप वाया जाण्याची भीती

News Desk