श्रीनगर | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान देशातील जनतेने घराबाहेर पडू नये, असे केंद्र आणि राज्य सरकार वारंवार आवाहन करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला आज (५ एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर पाकिस्तानच्या दहशवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्य काश्मीरमध्ये विविध भागा गेल्या २४ तासात झालेल्या कारवाईत ९ दशदवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.
In this operation, 1 Indian Army soldier has been lost his life while 2 more are critically injured. Operations to evacuate the injured have been hampered by heavy snow and rough terrain conditions. Operation is still in progress: Army sources https://t.co/BKPo6NiVv9
— ANI (@ANI) April 5, 2020
भारतीय सैन्यांनी केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाच तर दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. काश्मीरमधील ९ पाकिस्तानी दहशतवाद्यांनी खात्मा केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थने दिली आहे. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, ९ दशतवाद्यांचा खात्मा करत पाकिस्तानच्या भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.