HW News Marathi
Uncategorized राजकारण

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुनगंटीवारांनी केले मोठे विधान

मुंबई | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या दुसरा विस्तारात 23 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. यापूर्वी शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात 18 मंत्र्यांच्या समावेश केला होता. यात भाजपचे 9 तर शिंदे गटाचे 9 असे एकूण 18 मंत्र्यांचा समावेश करण्यात आल्या आहेत. मुनगंटीवारांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारात 23 मंत्र्यांचा समावेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुनगंटीवार म्हणाले, “पुढील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात आणखी 23 मंत्र्यांची भर पडणार आहे. कारण सभागृात एकूण सदस्य संख्येच्या तुलेत 15 टक्के मंत्री असून एकूण 43 जणांचे मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. म्हणजे अजून 23 मंत्र्यांची मंत्रिमंडळात निवड होणार आहे. यात शिवसेना आणि भाजप आमदारांतील किती मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळेल. हे पुढील काही दिवसात लवकरच होऊ शकतो.”

दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेसचा एक गट फुटून शिंदे गटात जाण्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. यानंतर शिंदे कॅबिनेटमध्ये यांना देखील स्थान दिले जाऊ शकतात. विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसचा एक गट फुटल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनुराग ठाकूरजी आमची KDMC फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट…”, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला

Darrell Miranda

मिलिंद नार्वेकरांनी दसरा मेळाव्याच्या कामाची केली पाहाणी; शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम

Aprna

पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

News Desk