HW News Marathi
Uncategorized

‘मेट्रो’ ३ च्या संचालक अश्विनी भिडेंना राज्याच्या प्रधान सचिवपदी पदोन्नती

मुंबई | मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना ठाकरे सरकारने बढती दिली आहे. भिडेंना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. अश्विनी भिडे या आरे मेट्रो-३च्या कारशेडच्या मुद्द्यावरून वाद राहिल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, ठाकरे सरकारने भिडेंना पदोन्नती दिली आहे. भिडेंना बढती दिल्याबरोबर एमएमआरसीएल आणि मेट्रो-3 चे संचालकपदही कायम ठेवले आहे.

मुंबईतील आरे कारशेडमधील वृक्षतोडीवरून झालेल्या वादनंतर मेट्रो-३ च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना शिवसेनेने टीका केली होती. मेट्रोच्या कारशेडच्या बांधकामासाठी रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी रात्रीच्या वेळेस आरेत मोठे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवत अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती. अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉर देखील रंगले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… तर राऊतांची जीभ जागेवर राहणार नाही !

swarit

आम्ही छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचे वंशज,औरंगजेबाचे नाही ! औरंगाबादचं संभाजीनगर करणार ..

Arati More

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी,सहा मराठी चित्रपटांची निवड

News Desk