नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. पंतप्रधानांनी काल (३ एप्रिल) जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाईट्स बंद करुन दिवा, मेणबत्त्या लावायचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनावर देशभरातून मोदींवर टीकास्त्र सुरु आहे. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली होती. त्यातच कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनीही ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे. टाळ्या वाजवून दिवे आणि टॉर्च लावून कोरोना पळणार नाही, असे राहूल गांधी यांनी ट्विट केले आहे. देशात कोरोनाच्या चाचण्या पुरेशा केल्या जात नाही आहेत. त्याकडे सरकारने लक्ष देणे जास्त गरजेचे आहे.
India is simply not testing enough to fight the #Covid19 virus.
Making people clap & shining torches in the sky isn't going to solve the problem. pic.twitter.com/yMlYbiixxW
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.