HW News Marathi
Uncategorized

“काल परवाच नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम आपण दिला”, चंद्रकांत पाटलांच वादग्रस्त वक्तव्य!


मुंबई।सध्या राज्याच्या राजकारणात एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप, दावे- प्रतिदावे हे पहायला मिळतात आणि अश्यातच मात्र आता भाजपकडून दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची आता बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना मात्र चांगलंच खडेबोल सुनावले. आपल्याला प्रखर विरोधी पक्षनेते बनायचं आहे. जूनपासून आपण काम करत आहोत. सरकार कधी येणार, देवेंद्रजी कानात तर सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… आता ही चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार कामही सुरू केलं असून वेळोवेळी तुम्हाला कार्यक्रमही दिले आहेत, असा सज्जड दम आता कधीच अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला.

नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा आपण कार्यक्रम दिला

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील असंही म्हणाले कालपरवाच नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा आपण कार्यक्रम दिला. आदल्या दिवशी 9 वाजता एका व्हिडीओ कॉलवर आपण हा कार्यक्रम दिला. दुसऱ्या दिवशी 26-27 मोठ्या शहरात आपण नवाब मलिकांचे पुतळे जाळले. अस वादग्रस्त वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुतळा जाळला गेला नाही, अटक केली नाही असं झालं नाही. इतकं कमी वेळात प्लानिंग झालं, असं त्यांनी सांगितलं. तसेच, इंधनावरील व्हॅट कमी करावा म्हणून आपण कार्यक्रम दिला. 400 हून अधिक जिल्हा केंद्र आणि तहसील केंद्रांवर निदर्शने करण्यात आली. निवेदने देण्यात आली, असंही चंद्रकांत पाटील दादरमधल्या या बैठकीत म्हणाले.

शहांच्या भाषेत सांगायाचं म्हणजे आपण ठोकके विजय मिळविला

या बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले की आपल्या पक्षाचा एक अतिशय शास्त्रीय कार्यक्रम ठरला आणि क्रम ठरला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते. त्यानंतर सात दिवसाने राज्याची बैठक होते. या बैठकीनंतर सात दिवसानंतर सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्या पाहिजे. पंढरपूरची विधानसभा आपण जिंकली. अमित शहांच्या भाषेत सांगायाचं म्हणजे आपण ठोकके विजयी मिळविला. असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह होता. त्याचवेळी 15 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात 10 हजार पंचायत समित्यांमध्ये आपले सरपंच झाले, असंही देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बैठकीत म्हणाले.

प्रखर विरोधी पक्ष म्हणून आपण खूप कामं केली. एसटीच्या आंदोलनात सर्व एसटी कामगारांच्या संघटना बरखास्त झाल्या. त्याचं नेतृत्व भाजपकडे आलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे आपले दोन नेते एसटी कामगारांच्या आंदोलनात आहेत. गोपीचंदला पाठवा, सदाभाऊंना पाठवा… अशी गावागावातून एसटी कर्मचाऱ्यांकडून डिमांड होत आहे. त्यांच्या कुठल्याही युनियन लिडरचं नाव कर्मचारी घेत नाहीत. कारण त्यांना सर्वांनी फसवलं आहे, असं मत देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी भाजपात समाधानी आहे !

swarit

छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशीला NIA कडून अटक

Aprna

कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या राज्यात केंद्राचे पथक येणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk