HW News Marathi
Uncategorized

राणेंची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमावेळी बॅंकेच्या ११ संचालकांवर गुन्हा!


बुलढाना | कोरोना नियमांच्या कात्रीत सध्या राणे अडकण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलीतील रानवारा रिसॉर्ट येथे चिखली अर्बन बँकेने उद्योजकता प्रशिक्षण व प्रोत्साहन शिबिर आयाेजित केले हाेते. या कार्यक्रमात नागरिकांची गर्दी झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाल्याने कार्यक्रमाच्या आयोजकांवर पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चिखली अर्बन बॅंकेच्या ११ संचालकांचा समावेश आहे.

बहुतांश जणांनी मास्क लावला नाही व उपस्थितांसाठी मास्क उपलब्ध करून दिले नाही

या तक्रारीवरून आशुतोष गुप्ता, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, सरव्यवस्थापक संजय भंगिरे, संचालक मनोहर खडके, सुधाकर कुळकर्णी, राजेंद्र शेटे, विश्वनाथ जितकर, देविदास सुरुशे, डॉ. गणेश मांटे, सुशील शेटे, शैलेश बाहेती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले हाेते. आयाेजकांपैकी बहुतांश जणांनी मास्क लावला नाही व उपस्थितांसाठी मास्क उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे चिखली पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश शिंदे यांच्या तक्रारीवरुन संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या वर्षी वाढणार या क्षेत्रातील नोकरदारांचे पगार

News Desk

सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार   

News Desk

डिप्टी कमिश्नरने नगरसेविकांच्या ग्रुपवर टाकले अश्लील फोटो

News Desk