HW News Marathi
Uncategorized

धनंजय मुंडेंच्या हस्ते ‘ई-ऊसतोड कल्याण’ अँपचे बीड येथे लोकार्पण

बीड। ऊसतोड कामगार ऊसतोडणी साठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना ओळखपत्र देणे अपेक्षित होते मात्र विशेष करून मराठवाड्यात अतिवृष्टीने ओढवलेल्या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहेत त्यामुळे नोंदणी प्रक्रिया मंदावली असली तरी प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी अशा सूचना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

ई-ऊसतोड कल्याण’ या अँपचे लोकार्पण

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची डिजिटल पद्धतीने नोंदणी करून त्यांना तात्काळ ओळखपत्र देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ई-ऊसतोड कल्याण’ या अँपचे लोकार्पण ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे अँप प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यातील कामगारांची नोंदणी कमीत कमी वेळेत करण्यासाठी तयार करण्यात आले असून पुढे हा प्रयोग सबंध राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती या प्रसंगी धनंजय मुंडे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्र

गोपीनाथगड (पांगरी) ता. परळी येथील गणेश एकनाथ मस्के हे या डिजिटल नोंदणीद्वारे राज्यातील पहिले ओळखपत्र धारक ऊसतोड कामगार ठरले आहेत. त्यांच्यासह सूर्यभान मोरे, शिवाजी लाटे, शिवाजी गोपाळा आंधळे, राजाराम बापूराव आंधळे, आसाराम बापुराव आंधळे, आश्रोबा गोपाळा आंधळे, भाऊराव संतराम आंधळे, अंकुश श्रीहरी सारुक, लक्ष्मण भगवान आंधळे आदी कामगारांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्यासह राज्यसभा सदस्य खा.रजनीताई पाटील, आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब काका आजबे, आ. संदीप भैय्या क्षीरसागर, आ. लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, बीडचे जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, जि. प. मुख्याधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक आर. राजा, मा.आ. साहेबराव दरेकर यांसह मुकादम संघटनेचे सारंग आंधळे तसेच समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांना लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून भविष्यात राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे हा अत्यंत महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री शर्लिन चोप्राचे हॉट फोटोज सोशल मीडियावर वायरल

News Desk

मुन्ना मायकल पुन्हा अँक्शन, डान्सचा थरार

News Desk

उदयनराजे राजीनामा देणार?, एका वाक्यात मोठं विधान

News Desk