HW News Marathi
Uncategorized

देशभरात आजपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

मुंबई | केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी (५ जुलै) अर्थसंकल्प मांडताना पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये प्रतिलीटरच्या दराने एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावण्याची घोषणा केली होती. देशभरात आज (६ जुलै) पेट्रोलचे दर प्रतिलीटर सुमारे अडीच रुपयांनी तर डिझेलचे दर प्रतिलिटर सुमारे २ रुपये ३० पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे आज मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ७८ रुपये ५७ पैसे प्रतिलीटर तर डिझेलचा दर ६९ रुपये ९० पैसे प्रतिलीटर झाला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचे अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकारने ठरविले आहे. मात्र येत्या काळात पेट्रोलचे दर नऊ रुपये तर डिझेलचे दर चार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल. या दरवाढीचे संकेत सरकारने अर्थसंकल्पात आहेत. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढविण्याची अधिसूचना जारी होईल. वित्तीय कायदा २००२मध्ये त्यासाठी दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर पेट्रोलच्या दरात ७ ते १० रुपयांपर्यंत आणि डिझेलच्या दरात १ ते ४ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर पाहाता पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वच्छ प्रसाधनासाठी जनजागृती रॅली

News Desk

अमरनाथ यात्रेत अडकले महाराष्ट्रातील भाविक

News Desk

रघुराम राजन यांना मिळून शकते अमेरिकेने बँकेवर उच्च स्थान

News Desk