HW News Marathi
Uncategorized

‘इस्टर्न फ्री वे’ला विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार

मुंबई। मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गाला (इस्टर्न फ्री वे) दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव दिले जाणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला असून नगरविकास विभागाला त्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसूलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल (१४ जानेवारी) आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त, परिवहन यासारख्या विभागांचे अधिकारी देखील उपस्थित होते. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

विलासरावांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख विधानसभेवर निवडून आले आहेत. धीरज पहिल्यांदाच आमदार झाले असून अमित देशमुख यांची ही तिसरी टर्म आहे. अमित देशमुख हे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली असून त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाची धुरा देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही’ – गोपीचंद पडळकर

News Desk

जेट एअरवेजच्या उपाध्यक्षांना अटक

News Desk

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश

News Desk