नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला अर्थसंकल्प आज (५ जुलै) संसदेत सादर करण्यात आला. मात्र, या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने-चांदीसाठी लागणाऱ्या सीमाशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीमाशुल्क १० टक्क्यांवरुन १२.५ टक्के आकारण्यात येणार आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman: It is also proposed to increase custom duty on gold & other precious metals from 10% to 12.5%. #Budget2019 pic.twitter.com/b3aS6GHBHO
— ANI (@ANI) July 5, 2019
सीमाशुल्कात वाढ झाल्यामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात ८००० रुपये तर चांदीच्या दरात १००० रुपये वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मोदी सरकारकडून मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोने चांदीसोबत पेट्रोल-डिझेलवर लावलेल्या १ रुपये अतिरिक्त करामुळे पेट्रोल-डिझेलही महाग झाले आहे. त्याचसोबत मार्बल, व्हिडीओ रेकॉर्डर, ऑटो पार्ट्स, सीसीटीव्ही कॅमेरा यासारख्या गोष्टीही महाग होणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.