मुंबई | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकात नरेंद्र मोदीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. या पुस्तकावरून भाजपवर देशभरातील शीवप्रेमींनी टीका केली आहे. या पुस्तकातून भाजपने महाराजांचा अवमान केला असून शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपविरोधात आज (१४ जानेवारी) सकाळी ११ वाजता राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. शिवरायांच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडूनछत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.
I am going to participate in a protest against BJP's attempt to compare Prime Minister Narendra Modi with Chhatrapti Shivaji Maharaj. The protest will be held on January 14, at 11 am, near Tilak Bhavan. Partyworkers and supporters will also participate in large numbers.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 13, 2020
थोरात पुढे म्हणाले की, ”छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले नरेंद्र मोदी मात्र जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे.” भाजपच्या या खोडसाळपणाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध केला जाणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.