नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधितांची संख्या ही ८ हजार ४४७ वर पोहोचली आहे. देशात गेल्या २४ तासात ९१९ नवे कोरोना रुग्ण अढळून आले तर ३१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती देशातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत २७३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची असून तर ७६४ जण करोनामुक्त झाले आहेत, अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती आज (१२ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
Increase of 918 new #COVID19 cases and 31 deaths in last 24 hours; India's total number of #Coronavirus positive cases rises to 8447 (including 7409 active cases, 765 cured/discharged/migrated and 273 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/UxUGztmPFG
— ANI (@ANI) April 12, 2020
देशामध्ये जे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळले तर २० टक्के रुग्णांना आयसूमध्ये दाखल करावे लागले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ लाख ८६ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४.३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती दिली आहे. तसेच या व्यतिरिक्त काहींची तपासणी कोविड हेल्थकेअर सेंटरमध्ये केली जाते. क्रिटिकल केसेस कोविड हॉस्पिटलमध्ये तपासली जातात जिथे व्हेंटिलेटर आणि आयसीयूची सुविधा असते. असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
As per 9th April data, if we needed 1,100 beds we had 85,000 beds. Today when we need 1,671 beds, then we have 1 lakh 5 thousand beds in the dedicated 601 #COVID hospitals: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/sB7wqfHea1 pic.twitter.com/OplUFXTVjL
— ANI (@ANI) April 12, 2020
“कोरोनाचा सामना करण्यासाठी ९ एप्रिलला आपल्याला ११०० विशेष बेड्सची आवश्यकता होती. त्यावेळी आपल्याजवळ ८५ हजार विशेष बेड्स होते. आज १६७१ विशेष बेड्सची गरज आहे तर आपल्याकडे 1 लाख 5 हजार विशेष बेड्स देशभरातील एकूण ६०० हॉस्पिटल्समध्ये आहेत”, अशी माहिती लव अग्रवला यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.