HW News Marathi
Uncategorized

जयंत पाटलांच्या बडबडीकडे शहारूखचे दुर्लक्ष

मुंबई: अभिनेता शहारूख खान याला शेकाप आमदार जयंत पाटील यांना झापझाप झापल्याच्या बातम्या सध्या सर्वत्र झळकत आहेत. परंतु शहारूख खानने त्यांच्या बडबडीकडे साफ दुर्लक्ष केल्याची माहीत समोर आली आहे. शहारूख अलिबागला जाण्यासाठी बोटीमध्ये बसला होता. याच वेळी जयंत पाटील यांना देखील अलिबागला जायचे होते. परंतु शहारूखमुळे चाहत्यांची मोठी गर्दी झाली व जयंत पाटील यांना त्यातून मार्ग मिळत नव्हता. त्यामुळे ते शहारूखवर संतप्त झाले. माझ्या परवानगीशिवाय कोणीही अलिबागमध्ये पाऊल ठेवू शकत नाही, असे त्यांनी शहारूखला खडसावले. हे सर्व संभाषण सध्या व्हायरल झाले असून जयंत पाटील यांना हिरो बनवले जात आहे. परंतु वस्तूस्थिती वेगळीच आहे. शहारूख खान ज्या बोटीमध्ये बसला होता. ती लक्सरीअस बोट होती. तो बोटीच्या वरील एसी रुममध्ये बसलेला होता. एसी रुममध्ये बसल्यानंतर बाहेर बोलणाºयाचा आवाज ऐकता येत नाही. असे असताना जयंत पाटील यांनी शहारूखबाबत जो त्रागा केला आहे, तो एकांगी दिसतो. कारण पाटलांचे बोलणे त्याला ऐकू गेलेच नाही. त्यामुळे पाटलांनी शहारूखला झापले म्हणणे गैर वाटते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रवी शास्रींच्या नावाला सर्वाधिक पसंती

News Desk

देश वाचविण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागेल !

News Desk

कोरेगाव-भीमा तपास एनआयएकडे सोपविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शरद पवार नाराज

News Desk