बंगळुरु। कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची कमान कोणाकडे जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून कर्नाटकाच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोम्मई यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
Basavaraj S Bommai to be the next CM of Karnataka announces BJP observer for the state and Union Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/poNFhORUHq
— ANI (@ANI) July 27, 2021
मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत त्यांचंही नाव
भाजपचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री बस्वराज बोम्मई हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. गेल्या काही दिवसात बोम्मई यांनी नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रल्हाद जोशी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत त्यांचंही नाव आलं होतं. मात्र, त्यावर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.
राजीनामा देताना काय म्हणाले येडियुरप्पा?
“कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे” अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.
बोम्मई कोण आहेत?
बस्वराज बोम्मई हे बी.एस. येडियुरप्पा यांच्यासारखेच वीरशैव लिंगायत समाजाचे प्रभावशाली नेते आहेत. ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, येडियुरप्पा यांनी लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करु नये, असं म्हटलं होतं. बस्वराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र आहेत. बोम्मई यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. बस्वराज बोम्मई 2008 मध्ये जनता दलातून भाजपमध्ये आले होते. यापूर्वी त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद होतं. ते इंजिनिअर असून त्यांनी टाटा ग्रुपमध्ये काही दिवस काम सुरु केलं होतं. बस्वराज बोम्मई दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले होते. तर, तीन वेळा हावेरी जिल्ह्यातील शिगांव मधून ते आमदार झाले आहेत.
पायउतार होण्याचे आधीच संकेत
बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. “25 जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा” असं वक्तव्य बीएस येडियुरप्पा यांनी केलं होतं.
काँग्रेस सरकार उलथवून भाजप सत्तेत
नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांचं सरकार 23 जुलै 2019 रोजी कोसळलं होतं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नव्हते. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार आलं. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त 99 मतं तर विरोधात 105 मतं पडली होती. बीएस येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.