HW News Marathi
Uncategorized

अंगणवाडीच्या आहारात अळी बालकांचे आरोग्य धोक्यात

उल्हासनगर(गौतम वाघ): उल्हासनगर कुर्ला कॅम्प येथील गुजरातील पाडा येथील अंगणवाडीमध्ये वाटण्यात आलेल्या उकडलेल्या मसालेदार चण्यांमध्ये अळी सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे अंगणवाडीच्या आहारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

उल्हासनगर कॅम्प 5 येथील कुर्ला कॅम्प परीसरातील गुजराती पाडयात एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी चालविण्यात येते. या अंगणवाडीत सुमारे 40 बालके आहेत. या बालकाना गुरूवारी दुपारी उकडलेल्या मसालेदार चण्यांचा खाऊ देण्यात आला. हा खाऊ निशिका जाधव या चार वर्षीय बालकाने डब्यातुन घरी नेला. तो खाण्यासाठी ताटात घेतला असता त्याच्या अळया दिसुन आल्या. याची माहिती परीसरातील समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांना कळताच त्यानी प्रसिध्दीमाध्यमांच्या प्रतिनिधीना बोलावुन या घटनेचा भांडाफोड केला.

अंगणवाडीतील सेविकाना याबाबत विचारले असता हा खाऊ आम्ही तपासुन बालकाना दिला होता, असे सांगितले. हा खाऊ ज्ञानदिप या बचत गटामार्फत पुरविला गेला असल्याचे समजते. या बचत गटावर कोणत्या प्रकारची कारवाई केली जाणार आहे, याबाबत विचारण्यासाठी प्रकल्प अधिकारी राहुल मोरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गांधींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांचा विजय ही देशासाठी चिंतेची बाब !

News Desk

ठाण्यात ‘पद्मावती’ चित्रपटाचा निषेध

News Desk

TATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर Uday Samant यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

Seema Adhe