नाशिक । नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल असून ३३ जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या मालेगावातील जिल्हा रुग्णालयासह इतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य परिवहन महामंडळाकडून केला जाणार असल्याची माहिती परिवहन संसदीय कार्य तथा अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ अॅड.अनिल परब यांनी दिली.
Maharashtra Transport Minister Anil Parab: The accident near Nashik is very unfortunate. A compensation of Rs 10 lakhs each will be given to the kin of the deceased and free medical treatment to all the injured. https://t.co/gUiObc8ZYX
— ANI (@ANI) January 28, 2020
कळवण डेपोची उमराणे-देवळा एसटी बस मालेगावहून धोबीघाट मेशीकडे जात होती. धोबीघाट परिसरात देश-विदेश हॉटेलजवळ काल (२८ जानेवारी) दुपारी ३ वाजताच्या सुमारास एसटी आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रिक्षावर धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस आणि रिक्षा ही दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
या अपघाताची माहिती मिळातच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. काही वेळात पोलीस आणि बचाव पथकही तेथे दाखल झाले. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम यांनी स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत दोन मृतदेह शोधण्याचे काम विहिरीत सुरू होते. सायंकाळपर्यंत क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस व अॅपरिक्षा बाहेर काढण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य घटनास्थळी सुरू होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.