HW Marathi
Uncategorized

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. हा ऐतिहासिक विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे भाजपला मिळाला आहे. देशात गेल्या ५० वर्षानंतर कुठल्याही पक्षाला नेत्याला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते, असे भाजपचते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशाला संबोधित करताना म्हटले होते. परंतु भाजपच्या नरेंद्र मोदींच्या सरकारला ते करून दाखविले आहे. यानंतर भाजपच्या वतीने दिल्ली येथील भाजपच्या मुख्यलयातून देशाला संबोधित करताना म्हणाले.

अमित शहा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे मेहनतीचे कौतुक करतानाच विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वावरून नाव न घेता राहुल गांधीवर टीका केली. पुढे शहा असे देखील म्हटले की, देशातील १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसचे डिपोजित जप्त झाले असल्याचे सांगत बोचरी टीका केली.

अमित शहा यांनी ” पश्चिम बंगालसारख्या हिंसाचारी आणि अत्याचारी राज्यात भाजपला १८ जागा मिळविण्यात यश मिळाले आहे. आगामी काळात भाजपा पश्चिम बंगालमध्ये प्रस्थापित होण्याचे हे संकेत आहेत.”असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी सत्तास्थापनेसाठी धावाधाव करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही मोदींनी टोला लगावला. चंद्राबाबू नायडू यांनी गाठीभेटी घेण्यापेक्षा थोडी मेहनत घेतली असती तर काही जागा निवडून आल्या असत्या, असा चिमटाही अमित शहांनी काढला.

Related posts

आंबेडकर नगरातील अवैद्य देशीदारूसह कुंटनखाना विरोधात महिलांचा एल्गार

News Desk

खेळाडू दारू प्यायल्याने भारत हारला

News Desk

विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे !

News Desk