HW News Marathi
Uncategorized

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना ‘कोरोना’ची लागण

मुंबई । नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. “माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे”, अशी माहिती रोहिणी खडसे यांनी ट्विटर दिली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना तिकीट नाकारल्यानंतर भाजपकडून रोहिणी खडसेंना मुक्ताईनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, रोहिणी खडसे या जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय असून नुकताच एकनाथ खडसे यांच्यासह त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार हाती घेणे अयोग्य  – राज ठाकरे

News Desk

… तर राऊतांची जीभ जागेवर राहणार नाही !

swarit

टॉयलेटमध्ये फोन वापरता? व्हा सावध!

News Desk