नवी दिल्ली | देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या कायद्याच्या विरोध करणाऱ्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता. या पार्श्वभूमीवर देशभारत दिल्लीच्या जामिया विद्यापीठाच्या हिंसाचाराचे पडसाद उमटले असून या प्रकरणाचा निषेध म्हणून देशातील ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शांतता राखण्याचे आवाहन केले असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे देखील त्यांनी सांगितले.
This is the time to maintain peace, unity and brotherhood. It is my appeal to everyone to stay away from any sort of rumour mongering and falsehoods.
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2019
मोदींनी म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ हा संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला असून दोन्ही सभागृहातील खासदारांनी मोठ्या संख्येने त्यास पाठिंबा दर्शवला आहे. हा कायदा देशाच्या शेकडो वर्षांपासूनची संस्कृती, स्वीकृती, प्रेम, करुणा आणि बंधुतेचे प्रतीक आहे.
The Citizenship Amendment Act, 2019 was passed by both Houses of Parliament with overwhelming support. Large number of political parties and MPs supported its passage. This Act illustrates India’s centuries old culture of acceptance, harmony, compassion and brotherhood.
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2019
या कायद्यानुसार अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील सहा समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि इसाई या सहा समुदायातील लोक जे ३१ डिसेंबर, २०१४ आधी भारतात आले आहेत, त्यांना सरसकट भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.