HW News Marathi
Uncategorized

पूनम राऊतने दिला ‘सुद्धृढ पाय, सुद्धृढ भारत’चा नारा

मुंबई, दिनांक १७, मुलांच्या पायांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य त्या फुटवेअरद्वारे वेळीच उपाययोजना केली तर ते दोष कायमस्वरूपी दूर होतात. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. रेलिश उपक्रमाद्वारे पायांच्या समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत क्रिकेटपटू पूनम राऊत हिने रेलिश उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सुद्धृढ पाय, सुद्धृढ भारत’चा नारा दिला.

क्रिकेटपटू पूनम राऊत हिचा गुरुवारी कांदिवली येथील महिला आधार भवनाच्या प्रमुख रुची माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डाबस्टर फूट एन्ड ऐंगकल केअर प्रा. लि.च्या वतीने रेलिश या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध ओर्थोपेडीक डॉ. संदीप सोनावणे, डाबस्टरचे सीईओ डॉ. भूषण हेमाडे, पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

२०१३ साली वर्ल्डकपच्या सामन्याच्या वेळी माझ्या पायांना इजा झाली होती. अतिशय वेदना होत होत्या. कोचच्या सल्ल्याने मी पायांची तपासणी करून घेतली. डॉ. भूषण हेमाडे यांनी आवश्यक ते इनसोल वापरण्यास सांगितले. तेव्हापासून मी फुटवेअरमध्ये बदल केले आणि माझी समस्या दूर झाली, मी आज खेळात जे स्थान मिळवले आहे ते या उपायांमुळेच, असे सांगत पूनमने पालकांनी मुलांच्या पायांची तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले. गेल्या अनेक बर्षांच्या रुग्ण तपासणीत केवळ मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्याही पायात दोष असतात आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे मला दिसून आले. सपाट तळवे, वाकडी टाचे, सदोष आकार, एकमेकांवर आपटणारे गुढगे, असे अनेक दोष या मुलांच्या पायात असतात. मुलांची हाडे, स्नायू, नाजूक आणि विकसनशील असतात. त्यामुळे त्यावर वेळीच इलाज केले तर ते सुद्दृढ होऊन शारीरिक फिटनेस जोपासला जातो. योग्य ते फुटवेअर वापरले तर कालांतराने पायांमधील दोष दूर होतात. त्यासाठीच पालक आणि शिक्षकांनी जागरूक राहून मुलांच्या पायांची चिकित्सा करून घेतली पाहिजे, असे डॉ. संदीप सोनावणे यांनी यावेळी सांगितले.

धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराच्या सर्व अवयवांची काळजी घेतो. पण शरीररूपी इमारत ज्या पायांवर उभी असते त्या पायांकडे मात्र सर्वांचे दुर्लक्षच होते. कोणत्याही इमारतीच्या भक्कमपणासाठी त्या इमारतीचा पायाही मजबूत असावा लागतो. डाबस्टर फूट एन्ड ऐंगकल केअर प्रा. लि.तर्फे गेल्या वर्षभरात मुंबईतील सहा शाळांमध्ये विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चिकित्सा शिबिरामध्ये ५० टक्क्याहून अधिक मुलांच्या पायांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे अनेक गंभीर दोष आढळल्याचे डॉ. भूषण हेमाडे यांनी सांगितले. रेलिश उपक्रमाद्वारे मुंबईतील शाळकरी मुलांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते फुटवेअर आणि कसरतीचे प्रकार सुचवण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाच्या आधी शंभर विद्यार्थ्याच्या पायांची मोफत तपासणी करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत टीबीने रोज मरतात १८ जण; महिला सर्वाधिक

News Desk

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

News Desk

धक्कादायक, स्वताच्या मुलीसह 140 महिलांवर 1000 वेळा बलात्कार , केलेल्या क्रूरकर्माचा हिशोब डायरीत नोंद

News Desk