HW Marathi
Uncategorized महाराष्ट्र

‘नाणार’ प्रकल्प रद्द केल्यामुळे प्रमोद जठार देणार भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

कणकवली | कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यामुळे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. “कोकणातील दीड लाख बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा ३ लाख कोटींची गुंतवणूक असणारा नाणार प्रकल्प आमच्या सरकारने आणला होता. परंतु, राजकीय भांडवल करून हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. हा प्रकल्प जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर जिल्हाध्यक्षपदावर मी राहणार नाही, असा शब्द मी इथल्या बेरोजगार तरुणांना दिला होत, असे म्हणात जठार यांनी सोमवारी (४ मार्च) राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.

कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाणार प्रकल्पातून २० हजार अभियंते याठिकाणी कामाला लागणार होते. त्यातून महिन्याला ३०० कोटी रु. पगाराला खर्च होणार होते. या प्रकल्पामुळे कोकणात खर्‍या अर्थाने समृध्दी येणार होती.  कोकणचा अर्थिक अनुशेष भरून निघणार होता. मात्र, केवळ राजकीय भांडवल करून कोकणच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याचे काम करत नाणार प्रकल्प रद्द करण्यात आला आहे, याचा आपण निषेध करतो.

पर्यावरणाची हानी, प्रदूषण आदी कारणांमुळे प्रकल्प रद्द झाला असता तर ते आम्ही समजू शकलो असतो. मात्र कोणतीही माहिती न घेता उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला ही चुकीची घटना आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाकडून ही अपेक्षा नव्हती. आपण मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा सादर करणार असल्याचे जठार यांनी सांगितले.

Related posts

तरुणाचा वीजेच्या खांबावर दोन तास धिंगाणा, तारा तोडल्या

News Desk

कच्च्या तेलाचे उत्पादन कमी होणार, इंधनाचे दर भडकणार

News Desk

निरुपम म्हणजे परप्रांतीय भटका कुत्रा, मनसेचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल

News Desk