HW News Marathi
Uncategorized

स्वच्छ प्रसाधनासाठी जनजागृती रॅली

विनोद तायडे,

वाशिम स्वच्छप्रसाधन हा विषयावर जनजागृती करण्यासाठी वाशिम रेल्वेप्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छता रॅलीतील विद्यार्थी आणि लोककलावंत यांनी दिलेल्या घोषणांनी शहरवासीयांचे लक्षवेधले. वाशिम जि. प. च्या स्वच्छ भारत मिशन या कार्यालयाचे चित्ररथ आणि लोककलावंतांनी गायलेले स्वच्छतेवरील गाणी हे या रॅलीचे मुख्य आकर्षण होते. सकाळी 8 वाजता नवोदय विद्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी हिरवा झेंडा दाखवुन रॅलीला सुरुवात केली. यावेळी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड मंडलचे सहाय्यक मंडल अभियंता बी. दयाल आणि स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी, जि. प. वाशिमच्या स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी- कर्मचारी आणि लोककलावंत यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. हलक्या पावसाच्या सरी चालु असतांनाहीही रॅली जोरदार घोषणाबाजी करीत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी नांदेड मंडळ चे अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक बी. विश्वनाथ इरय्या यांच्या हस्ते रेल्वे स्टेशन समोर वृक्षारोपन केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झालेय – नवाब मलिक

News Desk

आदिवासी भागात अंगणवाडीतील मुलांना अंडी पुरविण्यासाठी “स्वयम प्रकल्प” योजना राबविण्यात येणार     

News Desk

नवकलावंतांसाठी जहांगिरमध्ये प्रदर्शनाची संधी

News Desk
मुंबई

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

News Desk

मुंबई : धडपडत, चाचपडत रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने एकदाचा टीवाय बीकॉमचा निकाल जाहीरकेला खरा, पण अद्यापही तो विद्यार्थ्यांना काही पाहाता आलेला नाही. संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचे कारण यासाठी देण्यात येत असले, तरीही त्याने त्रस्त विद्यार्थ्यांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे सोमवारी अनेकविद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिलदरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन सुरू आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही ४० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेलेनाहीत. काही निकाल तांत्रिक अडचणींमुळे राखीव ठेवले आहेत. मात्र येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

विज्ञानाच्या पुरस्कारासाठी ते उतरले रस्त्यांवर!

News Desk

इरफान खानला ‘न्युरो इंडोक्राइम ट्युमर’ आजाराने ग्रासले

News Desk

एअरटेलतर्फे आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सच्या वेळेआधी डिलिव्हरीला सुरुवात 

News Desk