मुंबई | सुशांत सिंग राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput Case) शिवसेनेचे युवा नेता आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) बदनामी करण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. केसरकर म्हणाले,राणेंनी सुशांत सिंग प्रकरणात भाजपच्या कार्यालयातून पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंवर आरोप करत होते. राणेंच्या या कृत्याचा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती देखील केसरकरांनी आज (5 ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.
दीपक केसरकर म्हणाले, “आदित्य ठाकरेंबद्दल जे बोलले जाते. आणि त्या वस्तुस्थिती मध्ये जमिनीआसमानचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की, सुशांत सिंग प्रकरण जे महाराष्ट्रात घडले. त्यावेळा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि ही बदनामी करण्यामध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या पत्रकार परिषद घेतल्या त्याचा मोठा वाटा होता. आमच्यासारखे लोक जे ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करतात, ती सुद्धा यामुळे दुखावली गेली होती. आणि त्यामुळे भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. मी त्या नेत्यांना विचारले होते की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म अशा गोष्टींसाठी कसा वापरू शकता. त्यावेळी त्यांनी मला सांगितले आमच्या बहुतांश आमदारांचे अशा तरेच्या बदनामीला आमचा विरोध आहे.
“मी हे समजू शकतो की एखाद्या तरुण युवकांची बदनामी झाली तर ज्याला कुठे मोठे राजकीय भविष्य आहे. तर ते योग्य नसते. ज्यावेळा आपल्या घरातील एखाद्या तरुणाचे कुटुंबातील एका माणसाचे बदनामी होते. तेव्हा कुटुंबातील सदस्याला किती वेदना होतात. हे मी स्वत: समजू शकतो. त्यामुळे मला कोणीही सांगितले नव्हते. मी स्वत: च्या ओळखीतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांच्याशी संपर्क करण्याचा संपर्क केला. आणि मोदींच्या कानी ही सर्व वस्तू स्थिती सांगितली. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान हे अत्यंत शिस्तप्रिय व्यक्ती आहेत. कदाचित पंतप्रधानांनी मी कोण आहे, यांची माहिती देखील काढली असेल. त्यानंतर पंतप्रधानांनी ही माहिती व्यवस्थिती ऐकली. त्यावर पंतप्रधानांनी तातडीने दखल घेतली. या दरम्यानच्या काळात मी तुमच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देणार आहे. यानंतर मोदी आणि उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला. यानंतर दोघांची भेट देखील झाली होती. त्यावेळी मला मला पंतप्रधानांबाबत कळाले की कुटुंब प्रमुख कसा असावा?, यामध्ये ठाकरे कुटुंबियांप्रती असलेले प्रेम दिसून येत होते. मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्यात मी जास्त महत्व देतो,” असे केरकर म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.