HW News Marathi
Uncategorized

निरव मोदींकडे पासवर्ड असल्याने मुंबईतील पंजाब नॅशनल बँक सील

मुंबई | पंजाब नॅशनल बँकेची ब्रीचकँडी शाखा आज सील करण्यात आली. सीबीआयने ही कारवाई केली. या बँकेत ११ हजार कोटींचा घोटाळा करणारा नीरव मोदी व त्याचे हस्तक या बँकेचे कॉम्पुटर वापरत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

लेटर ऑफ अंडरटेकिंगसाठीचे सर्व लॉग-इन पासवर्ड हे मोदी आणि त्याच्याकडे होती अशी माहिती आता समोर आली आहे. पीएनबीचे माजी उपमहाव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, सीडब्ल्यूओ मनोज खरात, आणि नीरव मोदीचे ऑथराइज्ड सिग्नेटरी हेमंत भट्टने चौकशीत हा खुलासा केला आहे. नीरव आणि मेहुल चौकसी यांच्याशी संबंधीत 200 पेक्षा जास्त कंपन्यांची चौकशी सुरु आहे.

दरम्यान या घोटाळ्यामुळे एसबीआय, अलाहाबाद बँक, यूनियन बँक, यूको आणि एक्सेस बँकेच्या हाँगकाँग शाखेतील अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. याच बँकांमधून नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या कंपन्यांना एलओयूच्या आधारे कर्ज देण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जेम्स-ज्वेलरी क्षेत्रासाठी एलओयूची मर्यादा 90 दिवसांची असते. मात्र पीएनबी अधिकाऱ्यांनी हे एलओयू 365 दिवसांसाठी जारी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केळीच्या घटातून पाठवल्या जातात बनावट नोटा

News Desk

राज्य सरकार अडीच वर्ष चालणार, संजय शिरसाट नाराज नाही- मंत्री रावसाहेब दानवे

News Desk

अमिरचे चाहत्यांना भावनिक आवाहन

News Desk