नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएला ३५२ जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला. मोदींनी लाटेत माजी पंतप्रधानांसह १० माजी मुख्यमंत्र्यांचा दारून पराभव झाला आहे. तसेच अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला. २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभवाने काँग्रेसच्या अस्तित्वा प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. एच.डी देवेगौडा, शिला दीक्षित, भूपेंद्रसिंह हूड्डा, दिग्विजय सिंग, बाबूलाल मरांडी, हरिश रावत, सुशील कुमार शिंदे आदी दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.
माजी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला
एचडी देवेगौडा
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा देखील मोदी लाटेत आपला मतदार संघ वाचवू शकले नाहीत. तूमकूर मतदार संघातून देवेगौडा यांना १३ हजार ३३९ मतांनी पराभूत झाले असून देवेगौडा यांना भाजपच्या बसवराज यांना ७४ हजार ०४१ मतांनी पराभवाची धुळ चारली.
शिला दीक्षित
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांना आपला मतदार संघ राखण्यात अपयश आले. त्या उत्तर-पूर्व दिल्ली मतदार संघातून दीक्षित यांना ४ लाख २१ हजार ६९७ मतांनी पराभव झाला असून होत्या. मनोज तिवारी यांना ७८ लाख ७ हजार ७९९ मतांनी विजयी मिळवला.
भूपेंद्रसिंह हूड्डा
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा मोदी लाटेत विजय मिळविण्यात अपयशी ठरले. ते सोनिपथमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. हुड्डा यांना १ लाख ४४ हजार ८६४ मतांनी पराभव झाला असून भाजपच्या अरविंद कुमार शर्मा यांनी ७ लाख ७४ हजार ४१४ मतांनी विजयी झाला आहे.
दिग्विजय सिंह
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रज्ञा सिंह ठाकूर हिने दिग्विजय सिंह यांना ३ लाख ६४ हजार ८२२ मतांनी यांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पराभव केला आहे.
बाबूलाल मरांडी
झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. झारखंड मुक्ती मोर्चाचे बाबूलाल चार वेळ खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. भाजपचे अन्नपुराया देवी यांनी ४ लाख ५५ हजार ६०० मतांनी पराभव केला आहे.
अशोक चव्हाण
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपला गड राखण्यात अपयश आले. चव्हाण यांना ४० हजार १४८ मतांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाण यांचा पराभव केला.
सुशील कुमार शिंदे
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना आपला सोलापूर मतदार संघ राखण्यात यावेळीही अपयश आले. भाजपचे डॉ. जय सिद्धेश्वर यांनी १ लाख ५८ हजार ६०८ मतांनी शिंदे यांचा पराभव केला.
नवाम टुकी
काँग्रेसचे नेते आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नवाम टुकी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. नवाम टुकी यांना १ लाख ७१ हजार ६८३ मतांनी किरण रिजीजू यांनी पराभूत केले.
हरिश रावत
काँग्रेसचे हरिश रावत यावेळी मोदींच्या झंझावातात पराभूत होताना दिसले. २०१४ ते २०१७ या कालावधीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री असलेले हरिश रावत यांना भाजपच्या अजय भट्ट यांनी ३ लाख ३९ हजार ९६ मतांनी पराभव केला.
विरप्पा मोइली
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांना देखील मोदी लाटेचा सामना करावा लागला. कर्नाटकच्या चिकबलपूरच्या मतदार संघातून त्यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे बीएन गौडा यांनी मोईलीला पराभूत केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.